समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते अभिजित साळुंके व महेश रोचकरी यांना नियुक्ती पञ देताना उपस्थित मान्यवर....
तुळजापूर:-तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित अशोकराव साळुंके तर उपाध्यक्षपदी महेश भारतराव रोचकरी यांची नियुक्ती करण्यात आली. अभिजित साळुंके व महेश रोचकरी यांची सामाजिक कार्याच्याप्रती असलेली आवड तथा विविध सामाजातील उपेक्षित घटकांसाठी असलेली तळमळ पाहता समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) देवानंद रोचकरी यांनी अभिजित साळुंके यांच्यावर समाजवादी पार्टीच्या तुळजापूर शहराध्यक्षपदी व महेश रोचकरी यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत त्यांना नियुक्तीपत्र बहाल केले. अभिजित साळुंके यांनी समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव,शिवराज शेटे, विशाल शेटे,अमर वाघमारे, निलेश शिरसट,विकास शेटे, किरण आवताडे,बालाजी वटणे महेश वट्टे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)व्यापारी संघटना तालुकाध्यक्षपदाचा राजनामा देत समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन स्वागत केले.
समाजवादी पार्टी हा न्याय राजकिय पक्ष आपल्या भारत देशात मोठे योगदान देणारा पक्ष असुन या पक्षाची महाराष्ट्र राज्याची धुरा आमदार आबु असिम आझमी सांभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर समाजवादी पार्टीची मोठी पक्षबांधणी सध्या सुरु आहे, तमाम बहुजन तथा बंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले जात आहे. अभिजित साळुंके व महेश रोचकरी यांच्या निवडीबद्दल सर्वञ स्वागत होत असून उपस्थितांनी त्यांच्या भावी उज्वल कारकिर्द आणि वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments