Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बीडचे भूमिपुत्र तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विशाल राठोड यांना "बीड भूमिपुत्र पुरस्कार" जाहीर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव

                             डॉ.विशाल राठोड,बीड

धाराशिव:- "बीड भूमिपुत्र पुरस्कार” हा बीड जिल्ह्यातील कार्यरत व्यक्तींना मिळणारा प्रतिष्ठेचा व सन्मानाचा मानला जाणारा दैनिक लोकमत दिला जाणारा पुरस्कार असून यंदाचा पुरस्कार हा “बीड भूमिपुत्र पुरस्कार” बीडचे भूमिपुत्र खाजगी सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विशाल राठोड यांना जाहीर झाला आहे. लोकमत तर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. राठोड यांच्या कार्यकुशलतेची, सामाजिक बांधिलकीची आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेऊन जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विशाल राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात विकासात्मक योजनांची अंमलबजावणी, शासकीय कामकाजातील पारदर्शकता,तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत दाखवलेली तत्परता यामुळे प्रशासनात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा आणि कार्यतत्परतेचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला आहे.


"बीड भूमिपुत्र पुरस्कार” हा बीड जिल्ह्यातील कार्यरत व्यक्तींना मिळणारा प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. समाजकारण, प्रशासन, कला, संस्कृती, शिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

डॉ. विशाल राठोड यांना "बीड भूमीपुञ पुरस्कार" हा पुरस्कार खरोखरच हा त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची पोचपावती असून त्यांच्या या अध्द्भुत यशाचे धाराशिव येथील रहिवासी तथा जिल्हा समन्वयक धाराशिव सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे अँड राज राठोड यांच्या वतीने खुप खुप अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!

शुभेच्छुक:-अँड.राज राठोड,धाराशिव,जिल्हा समन्वयक धाराशिव सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments