तुळजापूर :-गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मा.श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उबाठा गटाचे कळंब-धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास (दादा) घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एचएसबीसी बिल्डिंग,फोर्ट,मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत "सहाय्यक पदाचा तीन वर्षे कालावधी हा नियमित सेवेत ग्राह्य धरण्यात यावा व सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकी दरम्यान मा.ऊर्जा राज्य मंत्री मा.श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास (दादा) घाडगे पाटील,
महावितरणचे संचालक (मा.सं) राजेंद्रजी पवार,कार्यकारी संचालक (प्रकल्प) मा.औंढेकर आणि मुख्य कार्यालयाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत चर्चा करताना आमदार कैलास (दादा)घाडगे पाटील यांनी इतर शासकीय कर्मचाऱ्यांचा सहाय्यक पदाचा तीन वर्षाचा कालावधी नियमित सेवेसाठी ग्राह्य धरला जातो. त्याच प्रमाणे महावितरणमधील सहाय्यक पदांचाही कालावधी ग्राह्य धरण्याबाबत समिती नेमावी अशी आग्रही भूमिका घेतली. तसेच या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वतीने ओंकार केसकर यांनी तीन वर्षे कालावधी हा शासनाच्या इतर विभागातील सेवक पदाचा कालावधी नियमित सेवेत व लाभ देण्यात ग्राह्य धरण्यात येतो, त्याप्रमाणे महावितरण कर्मचारी यांचाही तीन वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात यावा अशी प्रशासनाला विनंती केली. प्रशासनाला उपदान सेवानियम याबाबत अवगत करून कालावधी ग्राह्य धरावा असा युक्तिवाद केला. तसेच या बाबतीतील शासन निर्णय व परिपत्रके सादर केली.
यावेळी मा. ऊर्जा राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी समिती नेमून 45 दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महावितरण प्रशासनाला दिले.तसेच
कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासनही प्रशासनाच्या वतीने मा.संचालक यांनी यावेळी दिले.
सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकरिता आमदार कैलास (दादा) घाडगे पाटील यांनी आग्रही पाठपुरावा केल्याबद्दल सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या बैठकीस कर्मचारी प्रतिनिधी ओंकार केसकर, निलेश भिरंगे, प्रदीप घुले, ज्ञानेश्वर राऊत, समाधान सानप,सोमनाथ टाळकुटे उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
ONLY न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments