Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरात डिजे व लेझर गाड्यांना परवाणगी देऊ नये- तुळजापूरातील नागरिकांचे निवेदन

तुळजापूर:-तुळजापूर हे देशातील महत्वाचे तिर्थ क्षेत्र असून येथे अनेक भाविक भक्त बाहेरून येणारे यात्रेकरू व स्थानिक जेष्ठ नागरिक तसेच लहान मुले विद्यार्थी राहतात तसेच बाहेरूनही मोठ्या प्रमाणात यात्रेकरू श्री देवीजींच्या दर्शनासाठी येतात.विविध कार्यक्रमात व मिरवणुकीत प्रचंड आवाज असणाऱ्या डि जे साऊंडचा व त्यासोबत असणाऱ्या लेझर फोकस लाईटचा डोळ्यांना तसेच कानांला वृध्द व्यक्तिंच्या हृदयाला मोठया प्रमाणात त्रास होतो.

या डिजे व लेझर मुळे विविध प्रकारचे डोळे व कानाचे आजार होऊ लागले आहेत.त्याचे खूपच दुष्परिणाम दिसु लागले आहेत तसेच आनेक ठिकाणी डिजे व डाॅल्बी मुक्त मिरवणूक काढण्यात येणार आहेत.तरी या नियमबाह्य डिजे वाद्यावर व लेझर गाड्यावर नियमानुसार बंदी घालावी व अशा गाड्या जप्त करून त्यांच्यार दंडात्मक कारवाई अशा मागणीचे निवेदन तुळजापूर येथील नागरिकांनी पोलीस निरीक्षक,तुळजापूर पोलिस स्टेशन यांना दिले आहे.

या निवेदनावर भाई उत्तम अमृतराव,बाळासाहेब कुतवळ,भरत जाधव,मारूती नाईकवाडी,प्रकाश हुंडेकरी,कल्याण भोसले,श्रीकांत वाघे,प्रताप सुरवसे,सतीश दरेकर,अशोकराव साळुंके,जगदिश पेंदे,किसन भिमराव चव्हाण आदी नागरिकांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments