काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने शेतात पाणी साचल्याने प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले.पाच दिवस संततधार राहिल्याने जमिनी चिभडल्या आहेत.
त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. शेंगांमधील दाण्यांच्या फुगवणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या मूग,उडीद पिके काढणीच्या स्थितीत आहेत. तर, लवकर पेरलेले सोयाबीन पीक शेंगा परिपक्वतेच्या स्थितीत,तर मागून पेरलेले फुलोऱ्यात आहे.त्यामुळे यंदा पिकांची काढणी देखील मागे-पुढे होणार आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व पाच दिवस कायम राहिलेल्या संततधारेमुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे.त्यामुळे सोयाबीनची पिके पिवळी पडली आहेत.अजूनही पिकांत पाणी कायम असल्याने ही पिके वाया गेल्यातच जमा आहेत.त्यामुळे उत्पादन खर्चही हातात पडणे मुश्किल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून नुकसानग्रत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे़
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments