काटी:-तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मराठा सेवक मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतच आरक्षण मिळावे म्हणून आज पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सहभागी झाले आहेत.हे आंदोलन जितके दिवस चालेल तेवढे हे मराठा मावळे आंदोलनात सहभागी होणार आहेत,आता माघार नाही,ओबीसीतच आरक्षण घेणार असा निर्धार मनोज दादा जरांगे यांनी केला आहे,त्या आदेशानुसार आंम्ही पालन करणार आहोत असे या आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनात प्रदीप साळूंके,सुजित हंगरगेकर, विकास हंगरकर,आबासाहेब रोडे,मधुकर साळूंके, बबन शिंदे,शाम चव्हाण,राहुल हंगरकर,आखिल शितोळे आदी मराठा मावळे सहभागी आहेत.
0 Comments