Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महावितरण कर्मचाऱ्यांकडून सामाजिक बांधिलकीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

तुळजापूर:-सामाजिक बांधिलकी जपत महावितरण परिवार पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीस धावून आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा परिसरातील पूरग्रस्त ४० शेतकरी बांधवांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येकी ₹५०००/- इतकी थेट आर्थिक मदत केली.

मुसळधार पावसामुळे शेतजमिनी,पिके आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे भूम-परंडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकांसह घरांची हानी होऊन अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. 

महावितरणचे कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात नेहमीच एक भावनिक बंधन असते. ते शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी संदर्भात अडचणी समजून घेण्यास आणि त्यांना राञीअपराञी मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसारख्या अशा गंभीर प्रसंगी महावितरण परिवाराने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देत “शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची” भूमिका घेत मदतीचा हात पुढे केला. महावितरण कर्मचाऱ्यांचा हा पुढाकार पूरग्रस्तांना दिलासा देणारा ठरणार आहे.

महावितरण धाराशिवमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग सातत्याने सामाजिक उपक्रमांतून समाजातील गरजू, निराधार कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. या मदत उपक्रमालाही सर्व स्तरांतील अधिकारी, कर्मचारी व संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता धाराशिव-तुळजापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

महावितरण कर्मचाऱ्यांची ही मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात महावितरण कर्मचाऱ्यांकडून फक्त वीजपुरवठा नाही, तर आशेचा किरण निर्माण करणारी आहे.

महावितरण परिवार समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी भविष्यातही अशाच प्रकारे पार पाडत राहील, असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
9923005226

Post a Comment

0 Comments