Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लोकमंगल मल्टीस्टेटच्या काटी,सावरगाव,मंगरुळ, बेंबळी,काक्रंबा आदी शाखेत नवरात्री निमित्त ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळा उत्साहात संपन्न!; ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान

काटी/उमाजी गायकवाड
 लोकमंगल को.ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या वतीने बुधवार दि.1 ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील काटीसह सावरगाव,मंगरुळ,धाराशिव,तुळजापूर, काक्रंबा,आरळी,केशेगाव,बेंबळी या शाखेत भारतीय संस्कृतीतील नवरात्री निमित्त आयोजित ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

मातृशक्तीचे समाजातील महत्त्व,त्यांचे संस्कार, भारतीय स्ञीचे महत्व कळावे या उद्देशाने लोकमंगल को.ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या सर्व शाखेंच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो.

कार्यक्रमाचा प्रारंभ लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन पंडीत (नाना) लोमटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.सर्व उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक लोकमंगल मल्टीस्टेटचे विभागीय अधिकारी दिलीप गाजरे यांनी केले.त्यांनी आपल्या प्रस्ताविकात मातृशक्तीचे समाजातील महत्त्व,त्यांचे संस्कार आणि मूल्यांचे पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतर या विषयांवर विचार मांडत लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन पंडीत (नाना) लोमटे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते महिला उद्योजक,सामाजिक कार्यकर्त्या,बचत गट प्रमुख, डॉक्टर,वकील,शिक्षिका आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काटीसह सावरगाव,मंगरुळ,आरळी, काक्रंबा, केशेगाव,बेंबळी,तुळजापूर,धाराशिव या शाखेत ‘नवदुर्गाचा सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन पंडीत लोमटे यांनी भूषवले.

यावेळी विभागीय अधिकारी दिलीप गाजरे, शाखाधिकारी रवी पाटील,धन्यकुमार गलांडे,धनंजय कदम,सोमनाथ पावले,सतीश कोळी,राजकुमार पवार,सुनील साळुंके,बाळासाहेब कोरे,सचिन निकम, लक्ष्मी मॅडम यांच्यासह लोकमंगल मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments