तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील रायखेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रशालेत रायखेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवार दि.9 रोजी सकाळी स्वागत व निरोप समारंभाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजूर मंजुषाताई मगर ह्या होत्या.तर तिर्थ केंद्र प्रमुख महाजन व सरपंच शानुरबी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात या प्रशालेत नव्याने रुजू झालेल्या सहशिक्षक माळी,सहशिक्षिका वळसे, सहशिक्षिका वासंती गायकवाड शिक्षकांचा स्वागतपर सत्कार तसेच या प्रशालेतून बदली होऊन गेलेल्या सहशिक्षिका लोखंडे,चादरे सहशिक्षक नलावडे या शिक्षकांचा शाल,व पुष्पगुच्छ देऊन सत्काराने निरोप सोहळा घेऊन त्यांना विद्यार्थ्यांनी अश्रूभरल्या डोळ्यांनी भावपूर्ण निरोप दिला.
यावेळी सातवीतील विद्यार्थी दत्तात्रय मगर व सहावीतील विद्यार्थी रामचंद्र जाधव यांनी बदली झालेल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
"चांगले विद्यार्थी घडवणे हेच शिक्षकांचे खरे यश"
या प्रसंगी सरपंच शानुरबी शेख व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजुषाताई मगर यांनी नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत करताना शाळेच्या विकासात त्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले.तर सरपंच शानुरबी शेख यांनी "चांगले विद्यार्थी घडवणे हेच शिक्षकांचे खरे यश आहे" असे मत व्यक्त केले. तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी “शिक्षक व विद्यार्थी हेच शाळेचे खरे बळ असून त्यांच्यातील नाते अधिक घट्ट व्हावे" यासाठी प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा,शिस्त व ज्ञान या तीन गोष्टींवर भर द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बदली होऊन गेलेल्या शिक्षकांच्या वतीने शाळेला लोखंडी कपाट भेट दिले.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन सहशिक्षक सरवदे यांनी केले तर आभार सहशिक्षिका पवार -पाटील यांनी मानले.
यावेळी सरपंच शानुरबी शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंजुषा ताई मगर तीर्थ केंद्राचे केंद्रप्रमुख महाजन मुख्याध्यापक माळी वैशालीताई घाडगे हनुमंत भाऊ मगर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments