Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव जिल्ह्यातील कराटेच्या विद्यार्थ्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट लार्जेस्ट कराटे डिस्प्ले मध्ये नोंद...जिल्ह्याचा जगात डंका

                            
 मुरूम /प्रतिनिधी 
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलची ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी व क्रीडा शिक्षकाच्या सत्कार करण्यात आला. श्रेयशी शिंदे, अफसाना नदाफ व क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांचा विशेष  सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शकुंतला मोरे, केंद्रप्रमुख मुडगडे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, केंद्रप्रमुख अमोल थोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील तांब्रम येथे एस. वाय. बी. ए. टी. महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.५ ऑक्टोंबर २०२५ रोजी झालेल्या मार्शल आर्ट कराटेच्या प्रकारात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली असून या करीता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय आहे. या कॉलेजच्या प्रांगणात वर्ल्ड कराटे मास्टर्स असोसिएशन द्वारा आयोजित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट लार्जेस्ट कराटे डिस्प्ले या प्रकारामध्ये सकाळी ७ ते दुपारी अडीच पर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला. या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी लंडनहून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे कॉर्डिनेटर ऋषीनाथ आले होते. यांच्या उपस्थितीमध्ये ९८७ मुलांनी विविध मार्शल आर्ट टेक्निकचे  प्रदर्शन करून विविध वयोगटात मुले व मुली देशातील तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, जम्मू काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील कराटे खेळाडूंची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातून उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेचे खेळाडू अफसाना लाडली नदाफ (वय १५ वर्ष), श्रेयशी त्रिमूर्ती शिंदे (१५ वर्ष), महात्मा बसवेश्वर विद्यालयातील श्रेया अंकुशे (१४ वर्ष) व डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूलचे आराध्या प्रभाकर जाधव (९ वर्ष), सानवी बाळासाहेब पाटील (८ वर्ष), आदर्श अनिल कडूरे (८ वर्ष), आयुष युवराज पवार (१२ वर्ष), साहिल महंमदरफी शेख (१४ वर्ष), मुरुम येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे गीतांशू प्रफुल गव्हाणे (४. ५ वर्ष), देवांश राहुल चिलोबा (६ वर्ष ३), समर्थसिंग सुनील बायस (८ वर्ष), राजवीर बळीराम चौधरी (९ वर्ष) खेळाडू सहभागी झाले होते. आपल्या क्रीडा प्रकाराचे उत्तम सादरीकरण करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली. हा अभिमानाचा क्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतलेले अथक परिश्रम, मेहनत, जिद्द आणि प्रतिभेच्या जोरावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून शाळेचे,  समाजाचे नाव जगभर उज्ज्वल केल्याबद्दल जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments