Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे शरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुरूम /प्रतिनिधी 
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कै. माधवराव (काका) पाटील यांच्या नावाने तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन सोमवारी (ता. ६) रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या हेतूने यंदाच्या वर्षापासून पहिली वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. 

या स्पर्धेचे उद्घाटन उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. 

यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, गोविंद पाटील, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, गणेश अंबर, प्राचार्य अशोक सपाटे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, प्राचार्य सदाक वली, उपमुख्याध्यापक राधाकृष्ण कोढारे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, काशिनाथ मिरगळे, योगेश राठोड, विलास कांटेकुरे, विजयकुमार देशमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत बलसुर येथील छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम ५००१, मुरूमच्या कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र,रोख रक्कम ३००१, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख २००१ तर प्रा. संजय गिरी यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक यांच्या स्मरणात उत्तेजनार्थ प्रतिभा निकेतन विद्यालयातील प्रणिता सगर यास रोख ५०१ रुपये देऊन सत्कार करण्यात आला. नूतन प्राथमिक शाळेचे सहशिक्षक बसवराज  पाटील, उच्च माध्यमिक चे प्रा. उमाकांत महामुनी यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रा. संजय गिरी, प्रा. सुधीर नाकाडे, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. अजित सुर्यवंशी, प्रा. बिभीषण बंडगर, प्रा. विश्वजीत अंबर, प्रा. दयानंद राठोड, प्रा. राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा. अमोल गायकवाड, प्रा. रत्नदीप वाकडे, प्रा. सलीम जमादार, प्रा. अजित राठोड, प्रा. रेखा उण्णद, प्रा. दिपक सांगळे, प्रा. सरस्वती तपसाळे, प्रा. माधवी नरगिडे, प्रा. महेश सगशेट्टी, प्रा. साक्षी महामुनी आदींनी पुढाकार घेतला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमाकांत महामुनी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतिश रामपुरे तर आभार प्रा. अण्णाराव कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments