Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आयुष्यात आईची माया धरणीपेक्षाही मोठी पण बापाचे स्थान आभाळापेक्षाही उंच ! --हभप सुनिल ढगे महाराज

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक किसन हंगरगेकर वय 70 यांचे सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या तेराव्या विधी निमित्ताने हंगरगेकर कुटुंबियांच्या वतीने सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांनी शुक्रवारी सकाळी हभप सुनिल ढगे महाराज यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.

या किर्तन सोहळ्यात हभप सुनिल ढगे महाराज यांनी आपल्या किर्तनातून स्वर्गीय किसन दादा हंगरगेकर यांच्या विषयी माहिती देताना एक हसमुख व दिलदार व्यक्तीमत्व, तसेच बाप म्हणून त्यांनी पार पाडलेली जबाबदारी वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून उपस्थितांना संबोधित करताना आपल्या किर्तनातून
आईची माया मोठी,आई प्रेमळ, आई महान पण तुमचा बापही तुमच्यासाठी महान आहे. बापाचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. कुटुंबात सर्वांची काळजी बापच घेतो. तो आयुष्यभर धान्याच्या बैलाप्रमाणे कुटुंबासाठी राबराबत असतो मग म्हातारपणी त्याला एकटे पाडू नका त्यांची तुम्ही काळजी घ्या. त्यांचा आधार बना त्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका, म्हाताऱ्या बापाला कधीतरी प्रेमाने मिठी मारून त्याचेही दुःख जाणून घ्या. सर्वांनी फक्त आई महान असेच म्हटले आहे. पण बिचाऱ्या बापाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या जीवनात आईबापांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने त्यांची सेवा करा असेही आवाहन त्यांनी उपस्थित तरुण युवकांना केले. 
या किर्तन सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments