Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पांगरदरवाडीतील सहशिक्षिका भावना चौधरी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित

काटी /उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शिक्षिका भावना चौधरी यांना रविवार दि.28 रोजी स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर प्रतिष्ठानचा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार  आमदार प्रवीणजी स्वामी,कीर्तनकार श्यामसुंदर महाराज व नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 
यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यात भावना चौधरी (पांगरदरवाडी),सरिता उपासे,सुभाष वैरागकर,रघुवीर आरणे,बबिता महानूर,जगन्नाथ धायगुडे बाळासाहेब जमाले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षण क्षेत्रात भावना चौधरी यांनी आतापर्यंच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. शाळेवर विविध प्रकारचे उपक्रम घेऊन शाळेतील सर्व विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सतत प्रयत्न केला आहे. त्यांचे युट्यूब चॅनेल व शैक्षणिक ब्लॉग आहे. सहशिक्षिका भावना चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या महिलांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे अशा महिलांना साडी चोळी व श्रीफळं देऊन त्यांना सन्मानित केले आहे. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून झोपडपट्टीतील महिलांना नवीन साडया, फराळीचे खाद्यपदार्थ व फटाके देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सतत विध्यार्थ्यांना, पालकांना व विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून इतर शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.विशेष म्हणजे विध्यार्थ्यांना स्पर्धेत उतरण्यासाठी तत्पर राहून जादा तास घेऊन विध्यार्थ्यांना मंथन, नवोदय, शिष्यवृत्ती व होमी भाभा सारख्या स्पर्धा परीक्षेत पात्र केलेले आहेत. आसाम राज्यातील गुवाहटी येथे संपन्न झालेल्या एस सी इ आर टी ट्रेनिंग मध्ये त्यांनी धाराशिव जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.

               यांचा पुरस्काराने गौरव
यावेळी भावना चौधरी (पांगरदरवाडी,प्रा.संजय अस्वले,सुरेंद्र पाटील, अमर बिराजदार, मनोहर हराळकर, कुमार स्वामी, सरोजा बिराजदार,प्रवीण अगबरे, दत्तात्रय कोरे, महादेव शिंदे, वनमाला लोखंडे, सुनीता खंडागळे यांना ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
   
भावना चौधरी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पांगरदरवाडीचे मु अ व्यंकट कोळी तसेच सर्व शिक्षक वृंद तसेच शालेय समिती श्रीराम शेळके, रघुनाथ मारडकर आदी शिक्षणप्रेमी नागरिकांसह परिसरातून कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments