Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मुरुम /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करियर कट्टा अंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातून सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय म्हणून निवड केली जाते.सन  2026 या वर्षांसाठी उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास पुन्हा एकदा सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय म्हणून ए ग्रेड देऊन निवड केली आहे. संपूर्ण मराठवाड्यातून ए ग्रेड प्राप्त करणार श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय एकमेव महाविद्यालय आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चे कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते सेंट्रल एक्सलन्स महाविद्यालय सन्मानपत्र स्वीकारताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले, करिअर कट्टा समन्वयक डॉ एस. पी. पसरकल्ले, डॉ सी. डी. करे. यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर प्राचार्य डॉ. महामुनी यांची उपस्थिती होती.

बारामती येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजित पाच दिवसीय करिअर कट्टा अधिवेशन समारोप आणि धोरण निश्चिती कार्यशाळेत महाराष्ट्रातील करिअर कट्ट्याच कार्य करणाऱ्या महाविद्यालयाच्या कामगिरी नुसार सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालय म्हणून निवड आणि सन्मानपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. संजय अस्वले, महाविद्यालयीन समन्वयक आणि १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. करिअर कट्टा उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने विद्यार्थी संसद, उद्योजकता विकास क्लब, इमोशनल इंटेलिजन्स क्लब, फायनान्शियल लिटरसी क्लब या अंतर्गत विविध उपक्रम वर्षभर राबवत आहे. त्याचबरोबर करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा स्वतंत्र केंद्र, पोलीस अकॅडमी प्रशिक्षण केंद्र, स्वतंत्र अभ्यासिका, इंक्युबॅशन सेंटर, स्मार्ट क्लासरूम करिअर कट्ट्याच्या वतीने महाविद्यालयात उपलब्ध करून दिलेले आहेत.

Post a Comment

0 Comments