तुळजापूर:- तुळजापूर तालुक्याचे युवा नेते तथा कृष्णा भैय्या युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष व समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) देवानंद रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर तालुका देवराज मित्र मंडळ व कृष्णा भैय्या युवा मंचच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत यशस्वी,आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.
देवराज मित्र मंडळ व कृष्णा भैय्या युवा मंचच्या सदस्यांनी वाढदिवसानिमित्त केलेला सत्कार स्वीकारत त्यांच्या या प्रेमाबद्दल,सन्मानाबद्दल कृष्णा भैय्या रोचकरी यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी देवराज मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष ॲड.उदय भोसले,लिंगाय्या स्वामी,महाराज बापू बोंगर्गे,विकास बनसोडे,दत्तात्रय बिराजदार,राहुल भोसले,संजय माने, अंबादास जाधव,तात्या नन्नवरे,रामदास पवार,बापू नन्नवरे,राहुल जाधव आदी देवराज मित्र मंडळ व कृष्णा भैय्या रोचकरी युवा मंचमधील कार्यकर्ते उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments