Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सिंदफळच्या आखाड्यात 'जीवन'चा डंका; महाशिवरात्रीनिमित्त रंगला कुस्त्यांचा जंगी थरार!

तुळजापूर/सोमनाथ पुजारी 
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून महादेव यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित 'मुदगुलेश्वर मंदिर आखाडा' कुस्ती मैदान मोठ्या उत्साहात पार पडले. या मैदानातील मानाची शेवटची 21 हजारांची कुस्ती पैलवान जीवन भुजबळ (वाडी वडगाव) याने एकलंगी डावावर जिंकून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याने पैलवान किरण पांडुळे (परंडा) याच्यावर मात करत विजय संपादन केला.

सकाळपासूनच मुदगुलेश्वर मंदिर परिसरात कुस्तीप्रेमींची अलोट गर्दी झाली होती. या मैदानात धाराशिव, सोलापूर आणि बार्शी परिसरातील नामांकित तसेच नवोदित मल्लांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. लहान गटापासून ते खुल्या गटापर्यंत झालेल्या अटीतटीच्या लढतींनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
पारंपरिक खेळांना संजीवनी:
ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती जतन करणे आणि तरुणांना व्यासपीठ मिळवून देणे, या उद्देशाने या मैदानाचा घाट घालण्यात आला होता. विजेत्या पैलवानांना रोख बक्षीस, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अनुभवी पंचांनी या कुस्त्यांचे चोख काम पाहिले.

बबलू धनके यांच्या प्रयत्नांचे कौतुक:
सिंदफळ येथील पैलवान बबलू धनके यांनी गावातील व परिसरातील गरजू आणि होतकरू खेळाडूंसाठी उभारलेले कुस्ती संकुल व आखाडा आज ग्रामीण भागातील पैलवानांसाठी आधारवड ठरत आहे. माती आणि मॅटवरील कुस्तीची तयारी करण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे या भागातील खेळाडूंचा दर्जा उंचावत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

तरुणपिढीने व्यसनापासून दूर राहावे.
--बबलू धनके,सिंदफळ

"ग्रामीण भागातील मातीमध्ये ताकद खूप आहे, फक्त त्या ताकदीला योग्य तंत्राची आणि मैदाची जोड हवी. सिंदफळच्या आखाड्यातून उद्याचे महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी घडावेत, हेच आमचे स्वप्न आहे. असून तरुणाईने व्यसनांपासून दूर राहून मैदानी खेळांकडे वळावे, यासाठी आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पैलवानकी हा फक्त खेळ नाही, तर तो एक शिस्तबद्ध जीवन जगण्याचा मार्ग आहे."
पैलवान बबलू धनके,सिंदफळ ता.तुळजापूर 

Post a Comment

0 Comments