Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी महाविकास आघाडीच्या सौ.अनिता श्रीकांत वाघे यांची बिनविरोध निवड!

तुळजापूर:-तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, तुळजापूरच्या चेअरमनपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीच्या सौ. अनिता श्रीकांत वाघे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

निवड प्रक्रिया आणि सत्कार
सहायक निबंधक कार्यालयाचे अध्यासी अधिकारी श्री. ए.व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ. अनिता वाघे यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यांची लाभली उपस्थिती
या प्रसंगी संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने श्री. शिवाजी बोधले (संचालक),श्री. सुहास साळुंके (संचालक),श्री. अनिल शिंदे (व्हाईस चेअरमन),श्री. सुधीर कदम (संचालक),श्री. सुनील जाधव (संचालक),श्री. श्रीकांत वाघे (संचालक), श्री. खंडाप्पा पावले (संचालक),श्री. माणिक तोडकरी (संचालक),श्री. भैरू जाधव (संचालक),श्री. संजय धुरगुडे (संचालक),श्री. दयानंद क्षीरसागर (संघाचे लिपिक),

खरेदी विक्री संघाच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करु
   -नवनिर्वाचित चेअरमन सौ.अनिता वाघे
"तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि खरेदी-विक्री संघाच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू," असा विश्वास नवनियुक्त चेअरमन सौ.अनिता वाघे यांनी यावेळी व्यक्त केला.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments