मुरूम/प्रतिनिधी
शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या, मात्र अनेकदा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित राहिलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल रोटरी क्लब मुरूम सिटीने घेतली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ८) प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सभागृहात या 'स्वच्छता दूतांचा' साडी-चोळी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कर्तृत्ववान मातांचा सन्मान
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने आणि जिद्दीने आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या मातांचा झालेला गौरव. यामध्ये सुमन शिंदे व लक्ष्मण शिंदे पाटील यांचा मुलगा बलराज शिंदे पाटील याने सी. ए. (CA) परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिल्पा डागा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुवर्णा पाटील, उमरगा सेंटरच्या शिल्पा क्षीरसागर, आणि मुरूम सेंटरच्या अनिता मिरकले यांची उपस्थिती होती.
सत्कारमूर्ती महिला कर्मचारी
कार्यक्रमात मुरूम नगर परिषदेतील गिरीजा कांबळे, सुनिता क्षीरसागर, चिंताबाई कांबळे, सुक्षाबाई भालेराव, शिवगंगा कांबळे, ज्योती हावळे, नंदाबाई कांबळे, मनीषा वाघमारे, नंदिनी कांबळे, कल्याणताई कांबळे, शांता कांबळे, वैशाली सोनकांबळे, अनिता कांबळे, आणि लिंबाबाई कांबळे या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नियोजन आणि संयोजन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. यशस्वीतेसाठी सुनील राठोड, कल्लाय्या स्वामी, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे, प्रा. भूषण पाताळे, वैष्णवी सूर्यवंशी आणि श्रुती नागदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर आभार सचिव कल्लाप्पा पाटील यांनी मानले.
रोटरी क्लबच्या या संवेदनशील उपक्रमाबद्दल सफाई कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, संपूर्ण शहरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
मुरूम (ता. उमरगा) येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये महिला दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना डॉ. शिल्पा डागा, डॉ. सुवर्णा पाटील, शिल्पा क्षीरसागर, अनिता मिरकले व रोटरी सदस्य.
0 Comments