Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक: राजकीय हालचालींना वेग; रोचकरी पिता-कन्याची तानाजी सावंतांशी सदिच्छा भेट! शिंदे गटाला मिळणार बळ; 'समाजवादी'च्या सीमाताई माडजे यांचा सावंत यांना पाठिंबा?

सीमाताई माडजे-रोचकरी यांची आमदार तानाजी सावंत यांची भेट 

तुळजापूर | Only न्युज धाराशिव' 
धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगरुळ गटातील समाजवादी पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे-रोचकरी आणि माजी नगराध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीमुळे जिल्हा परिषदेच्या सत्तासमीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

काय आहे नेमकं समीकरण?
येत्या १३ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ५५ सदस्यीय जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही.
 पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे आहे:
पक्ष सदस्य संख्या
भाजप १९
शिवसेना (शिंदे गट) १५
शिवसेना (ठाकरे गट) ०७
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ०६
काँग्रेस ०३
समाजवादी पार्टी ०१ (सीमाताई माडजे)
अपक्ष ०४

आमदार तानाजी सावंत,माजी नगराध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी व जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे-रोचकरी 

बहीण-भावाच्या जोडीची पुन्हा चर्चा
निवडणुकीत मंगरुळ गटातून सीमाताई माडजे-रोचकरी या एकमेव समाजवादी पार्टीच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत, तर त्यांचे बंधू कृष्णा भैय्या रोचकरी हे आरळी बुद्रुक गणातून पंचायत समितीवर निवडून आले आहेत. एकाच वेळी बहीण जिल्हा परिषदेत आणि भाऊ पंचायत समितीत विजयी झाल्याने यापूर्वीच त्यांची चर्चा राज्यभर झाली होती. आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सावंतांच्या निवासस्थानी महत्त्वाची चर्चा
भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अर्चनाताई पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले असतानाच, आमदार तानाजी सावंत यांनीही अध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडेच राहणार असल्याचा दावा केला आहे. याच काळात देवानंद भाऊ रोचकरी आणि सीमाताई माडजे यांनी सावंतांची भेट घेऊन त्यांना समर्थन देण्याची ग्वाही दिल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची रंगत वाढली आहे.
जिल्ह्याचे लक्ष १३ मार्चकडे
भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही मित्रपक्षांनी अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमधील हा अंतर्गत कलगीतुरा कोण जिंकणार आणि १३ मार्चला जिल्हा परिषदेच्या लाल दिव्याच्या गाडीवर कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Post a Comment

0 Comments