Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ऐतिहासिक क्षण! धाराशिव जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे विराजमान; निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान!कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह; सत्तेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार! पदभार स्वीकारताच सभापती सिद्धेश्वर कोरे यांचा निर्धार.

 "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | उमाजी गायकवाड 
धाराशिव जिल्हा परिषदेच्या राजकारणात एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला असून, अर्थ व बांधकाम सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते श्री. सिद्धेश्वर (अण्णा) कोरे यांची झालेली निवड ही खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्याच्या कष्टाचा आणि निष्ठेचा विजय मानली जात आहे. आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात कोरे यांनी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.

लोकशाहीचा उत्सव आणि कार्यकर्त्यांचा अभिमान:
जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापतीच्या दालनात आज सकाळी हा पदभार सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. कोरे यांना खुर्चीत बसवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. केवळ पद स्वीकारणे नव्हे, तर सुशासन, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारा कारभार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी कोरे यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आपल्या नेत्याच्या निवडीचा सार्थ अभिमान स्पष्टपणे झळकत होता.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती:
या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी उपस्थित राहून कोरे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाला मिळणार नवी गती:
सिद्धेश्वर कोरे यांची प्रशासकीय कामावरील पकड आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण पाहता, आता अर्थ व बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांच्या कामांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. "सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि पारदर्शक कारभाराचा आदर्श निर्माण करणे हीच आपली प्राथमिकता राहील," अशी भावना यावेळी नवनिर्वाचित सभापतींनी व्यक्त केली.

महायुतीची एकजूट आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या बळावर हा सोहळा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. श्री. कोरे यांच्या रूपाने अर्थ व बांधकाम विभागाला एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना जनसामान्यांतून उमटत आहे.

अहोरात्र जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान 
                           - सौ.अर्चनाताई पाटील 
"सिद्धेश्वर (अण्णा) कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापतीपदी झालेली निवड हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, अहोरात्र जमिनीवर काम करणाऱ्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याचा हा विजय आहे.
सत्तेचा उपयोग हा शेवटच्या घटकातील व्यक्तीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, हे आमचे ध्येय आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या मुख्य प्रवाहात न्याय देण्याची भूमिका आमच्या नेतृत्वाने नेहमीच जपली आहे आणि आज त्याचेच प्रतिबिंब या निवडीतून दिसत आहे."
— सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील (अध्यक्षा, जिल्हा परिषद धाराशिव)

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कष्टाचे फळ 
                          -सभापती विक्रमसिंह देशमुख 
"प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कष्टाचे फळ मिळतेच, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. अण्णा कोरे यांच्या रूपाने अर्थ व बांधकाम विभागाला एक अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासकामांना, विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांना मोठी गती मिळेल, असा मला ठाम विश्वास आहे."
                            --विक्रमसिंह देशमुख 
                 सभापती पंचायत समिती तुळजापूर

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची  व विश्वासार्ह बातमी!

Post a Comment

0 Comments