"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि महायुती सरकारच्या धोरणांविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रा' काढण्यात येणार आहे. ही यात्रा सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सुरतगाव ते तुळजापूर अशी काढली जाणार असून, सायंकाळी तुळजापूर येथे भव्य जाहीर सभेने याचा समारोप होणार आहे.
काय आहेत मुख्य मागण्या?
या न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत:
भूसंपादन मोबदला: सुरत-चेन्नई महामार्ग आणि सोलापूर-धाराशिव-बीड रेल्वे प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या ४ पट मोबदला मिळावा.
कर्जमाफी आणि पीकविमा: २०२० ते २०२५ पर्यंतचा थकीत पीकविमा त्वरित द्यावा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी लागू करावी.
वीज आणि महागाई: घरगुती व व्यावसायिक गॅस दरवाढ कमी करावी. तसेच, शेतीसाठी ८ तास मिळणारी वीज आता ५ तासांवर आली आहे, ती पूर्ववत करून सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी.
इतर मागण्या: सोयाबीन-हरभरा खरेदी केंद्रांवरील निधीची पूर्तता, कांद्याला ३००० रुपये हमीभाव, आणि 'स्मार्ट मीटर'ची सक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप:
प्रारंभ: सोमवार, ३० मार्च २०२६, सकाळी ८:०० वाजता.
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुरतगाव, ता. तुळजापूर.
सभेचे ठिकाण: शारदा मंगल कार्यालय, धाराशिव रोड, तुळजापूर.
वेळ: सायंकाळी ५:०० वाजता.
या शेतकरी संघर्ष न्याय यात्रेत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन
धाराशिव जिल्ह्यातील देवस्थान इनाम आणि वर्ग २ च्या जमिनी तांत्रिक अडचणी दूर करून वर्ग १ मध्ये रूपांतरित कराव्यात, ही देखील या लढ्यातील महत्त्वाची मागणी आहे. या यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकरी टबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज (भैय्या) पाटील जिल्हा काँग्रेस कमिटी, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments