धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
वाढत्या शहरीकरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि शहराला हिरवेगार करण्यासाठी 'हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'च्या वतीने एक स्तुत्य पाऊल उचलण्यात आले आहे. रविवार, १९ जुलै रोजी शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील शिवतीर्थ नगर येथे फाऊंडेशनच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ३१ देशी वृक्ष लावण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती आणि दाद
या वृक्षारोपण मोहिमेला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून पाठबळ दिले. यामध्ये जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर आणि हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षलागवड पुरेशी नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
देशी वृक्षांना प्राधान्य
पर्यावरणाला दीर्घकाळ पूरक ठरणाऱ्या आणि स्थानिक हवामानात टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांच्या लागवडीवर फाऊंडेशनने भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने कडुलिंब १४,बकुळ ५,वड: ३, कदंब ३, पिंपळ ३, करंजी २,पिवळा गुलमोहर १, या एकूण ३१ वृक्षांच्या रोपांचा समावेश आहे.
फाऊंडेशनच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी श्रमदान केले. यामध्ये प्रा. अभिमान (आबा) हंगरगेकर, प्रमोद हुग्गे सर, अमरसिंह गोरे सर, आनंद जगदाळे, प्रविण देशमुख, अभिषेक बागल, नसीर भाई शेख, सचिन मोरे साहेब, हनुमंत ठेले सर, कवितकर साहेब, नवनाथ रोडगे, महेश देशमुख, रोहित बागल, तानाजी बचाटे सर, डॉ. गणेश चव्हाण साहेब, संजय चव्हाण सर, बाळासाहेब केदार, मनोज सरडे, महेश उंबरे, रोहित माने, मोदाणी सर आणि ईश्वर पाटील आदी मान्यवर व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लावलेल्या सर्व झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन करण्याचा संकल्प या वेळी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
"धाराशिवकरांच्या हक्काचं व्यासपीठ, थेट आणि पारदर्शक!"Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
0 Comments