तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने तुळजापूर नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखीचे गुरुवार, दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ठीक दोनच्या सुमारास तुळजापूर नगरीत मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या उपस्थितीत आगमन झाले. या निमित्ताने कणे स्टाफ, धाराशिव रोड येथे तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने श्रींच्या पालखीचे अत्यंत भावपूर्ण आणि जंगी स्वागत करण्यात आले.
पालखीचे शहराच्या हद्दीत आगमन होताच परिसर भक्तीमय झाला होता. नगरपरिषदेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे पूजन व आरती करण्यात आली.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
श्रींच्या पालखी स्वागताच्या या मंगलप्रसंगी तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष विनोद पिटुभैया गंगणे, माजी नगरसेविका प्रियाताई गंगणे तसेच मुख्यधाकारी अजिंक्य रणदिवे, उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांच्या शुभहस्ते पालखीचे स्वागत करून दर्शन घेण्यात आले.
या सोहळ्याला नगरपरिषदेचे सन्माननीय सदस्य लखन पेंदे, नरेश काका अमृतराव, आनंद सावंत, दिनेश अण्णा क्षीरसागर, विजय आबा कंदले, अमर दाजी हंगरगेकर आणि नगरसेविका नीता क्षीरसागर यांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.
नगरपरिषद प्रशासनाकडून मानवंदना
पालखी स्वागतासाठी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये नगर अभियंता अतुल तोंडारे, चांगदेव ढोले, बापूसाहेब रोचकरी, बालाजी कोळी, प्रशांत चव्हाण, विश्वास मोटे, बालाजी जाधव, सुनील पवार, लेखापाल शरयू पाटील, पुष्पांजली मंगरुळे, संज्योत सावंत यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत सेवा बजावली.
पालखीच्या आगमनामुळे तुळजापूर-धाराशिव रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी नागरिकांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या, तर संपूर्ण परिसर गजानन महाराजांच्या जयघोषाने प्रतिध्वनित झाला होता.
'Only न्यूज धाराशिव' - थेट, अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा.
0 Comments