Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

‘बळीराजाचे राज्य येऊ दे, शेतकरी सुखी राहू दे!’ : नाना पटोले यांनी सहकुटुंब घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

' Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी रविवारी (दि. १९) श्री क्षेत्र तुळजापूर येथे भेट देऊन कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतले. "राज्यातील शेतकरी राजा सुखी राहू दे आणि बळीराजाचे राज्य येऊ दे," असे साकडे यावेळी नाना पटोले यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी घातले.

श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात महापूजा आणि दर्शन घेतल्यानंतर तुळजापूर मंदिर संस्थानच्या वतीने नाना पटोले यांचा आई तुळजाभवानीची प्रतिमा व शाल-श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना
दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, "आई तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीपीठ आहे. राज्यातील जनतेवर, विशेषतः अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजावर आलेले सर्व संकटे दूर व्हावीत, पावसाचे प्रमाण उत्तम राहून शेतकरी सुजलाम-सुफलाम व्हावा, हीच प्रार्थना आईच्या चरणी केली आहे."

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या धार्मिक आणि कौटुंबिक दौऱ्याच्या प्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी प्रामुख्याने धीरज (भैय्या) पाटील (माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस),अमोल कुतवळ (नगरपरिषद गटनेते),रणजित इंगळे (नगरसेवक),आनंद जगताप (नगरसेवक),अरविंद बेडगे (तालुकाध्यक्ष),हरीश चव्हाण यांच्यासह स्थानिक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पटोले यांच्या या दौऱ्यामुळे तुळजापूर मंदिर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments