Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आषाढी वारीच्या अभंगस्नानात यमगरवाडी-मंगरूळचे एकलव्य विद्या संकुल तल्लीन; सीमा अयाचित यांच्या किर्तनाने वेधले लक्ष


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ - यमगरवाडी येथील 'एकलव्य विद्या संकुलात आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका विशेष किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्म आणि विज्ञानाचा सुसंवाद साधत लातूरच्या प्रसिद्ध महिला कीर्तनकार सीमा विवेक अयाचित यांच्या ओघवत्या वाणीने आणि खुमासदार निवेदनाने संपूर्ण परिसर विठू नामाच्या गजरात दुमदुमून गेला.
​अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर मेळ
​किर्तनरूपी सेवेची सुरुवात करताना सीमा अयाचित यांनी वारकरी संप्रदायाची महती आणि आषाढी वारीच्या परंपरेवर प्रकाश टाकला. पंढरीचा विठ्ठल हे महाराष्ट्रासह देश-विदेशातील कोटी कोटी भक्तांचे आराध्य दैवत असल्याचे सांगत, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमधून चालत येणाऱ्या लहान-मोठ्या दिंड्या, विठू नामाचा गजर आणि माऊलींच्या दर्शनाची ओढ यावर त्यांनी उपरोधिक व अभ्यासपूर्ण भाष्य केले. विशेष म्हणजे, आजच्या युवा पिढीला समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी अध्यात्म आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या अंगांची सांगड घालून सखोल मांडणी केली, जी उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली.
​बोधकथांनी विद्यार्थ्यांना केले मंत्रमुग्ध
​विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच नैतिक मूल्ये रुजावीत यासाठी त्यांनी अध्यात्मातील विविध प्रकारच्या प्रेरक बोधकथा सांगितल्या. या बोधकथांमधून जीवन जगण्याचे मूल्य आणि कष्टाळू वृत्तीचे महत्व सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद विशेष लक्षवेधी ठरला.
​सुरेल संगीत आणि पारंपरिक संगत
​या किर्तन सोहळ्याला सुरेल संगीताची जोड लाभली. संकुलाचा माजी विद्यार्थी अतुल यमगर यांनी आपल्या बोटटंचाईच्या कलेने तबल्याची सुरेख साथ दिली, तर सहशिक्षक संतोष बनसोडे यांनी पेटीची साथसंगत करत किर्तनाची रंगत वाढवली. तसेच यमगरवाडी येथील मोहन वाघमोडे व त्यांच्या भजनी मंडळाच्या सहकाऱ्यांनीही या सोहळ्यात सक्रीय सहभाग नोंदवला.
​मान्यवरांचा सत्कार व शिस्तबद्ध संचालन
​कार कार्यक्रमाच्या सुरुवातीला किर्तनकार सीमा अयाचित यांचा संस्थेच्या वतीने सुजाता गणवीर यांनी यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अस्मिता भोजने आणि रूपाली गिरी यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण रीतीने केले, तर पाहुण्यांचा परिचय संस्कार सुपलकर यांनी करून दिला.
​या मंगलमय सोहळ्याला मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोलटकर, फुलाजी ताटी कुंडलवार, संगीता पाचंगे, निर्मला हुग्गें, प्राणिताबाई शेटकार यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विठू नामाच्या जयघोषात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण मंगरूळ-यमगरवाडी परिसर भक्तीमय होऊन गेला होता.

Post a Comment

0 Comments