Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

॥ श्री तुळजाभवानी प्रसन्न ॥ आयडीबीआय बँकेचा तुळजाभवानी मंदिर संस्थानाला डिजिटल हातभार; CSR अंतर्गत ६ लॅपटॉप सुपूर्द!


तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी लीन होणाऱ्या जगभरातील लाखो भाविकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित सेवा मिळाव्यात, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाने कंबर कसली आहे. याच डिजिटल पर्वाला बळ देण्यासाठी IDBI बँकेने आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत मंदिर संस्थानाला ६ अत्याधुनिक लॅपटॉप भेट दिले आहेत.

मंदिर संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उपेंद्र तामोरे यांच्याकडे IDBI बँकेच्या तुळजापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. पंकज खरोटे यांच्या हस्ते हे लॅपटॉप नुकतेच हस्तांतरित करण्यात आले. या डिजिटल मदतीमुळे मंदिर प्रशासनाच्या कामकाजाला आता अधिक गती मिळणार आहे.

भक्तांच्या सेवेसाठी तंत्रज्ञानाचा जागर!
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात दररोज हजारो-लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या ऑनलाईन पास, देणगी व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता अन् वेग यावा, यासाठी हे लॅपटॉप अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

या हस्तांतरण सोहळ्यास तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने, IDBI बँकेचे वरिष्ठ अधिकारी, तसेच मंदिर संस्थानाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक बांधीलकीची परंपरा!
IDBI बँकेने मंदिर संस्थानाला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मार्च २०२६ मध्ये बँकेने CSR निधीतून मंदिराला 'Tata ACE EV' हे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन देखील प्रदान केले होते. सातत्याने मिळणाऱ्या या सहकार्याबद्दल मंदिर संस्थानाच्या वतीने IDBI बँक व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments