Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरचे डॉ. शाम होळकर यांना 'महा ॲक्युपंक्चर रत्न' पुरस्कार प्रदान!आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे दिमाखदार सोहळ्यात सन्मान

तुळजापूर |'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर येथील सुप्रसिद्ध 'श्री तुळजाई आयुर्वेद, पंचकर्म व निसर्गोपचार केंद्रा'चे संचालक डॉ. शाम चंद्रकांत होळकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या 'महा ॲक्युपंक्चर रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन' (AIMA) च्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात १९ जुलै रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ॲक्युपंक्चर, निसर्गोपचार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांना दिलेल्या उत्कृष्ट सेवांची दखल घेऊन डॉ. शाम होळकर यांची या राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच राज्यभरातून आलेले तज्ज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुर्वेद व निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यसेवा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या डॉ. शाम होळकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुळजापूर शहर व धाराशिव जिल्ह्यातून, तसेच वैद्यकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments