Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

एकलव्य विद्या संकुलात दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी; प्रशासकीय शिस्त अन् लोककल्याणाचा ध्यास घेणाऱ्या नेतृत्वाला तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी-मंगरूळ येथे अभिवादन


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
आपल्या रोकठोक वक्तृत्वासाठी, प्रशासनावरील घट्ट पकडीसाठी आणि गतिमान विकासाच्या ध्यासामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी-मंगरुळ येथील  'एकलव्य विद्या संंकुल, येथे अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.  

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस आणि महाराष्ट्र विकासातील योगदानास अत्यंत आदराने अभिवादन करण्यात आले.  

प्रशासकीय शिस्त अन् तत्परतेचा वस्तुपाठ
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. "दादा म्हणजे वेळेचे तंतोतंत नियोजन, कामातील स्पष्टता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अहोरात्र राबणारा नेता! राज्याच्या अर्थकारणाला शिस्त लावतानाच त्यांनी शिक्षण, सहकार आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही," अशा शब्दांत वक्त्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

मान्यवरांची उपस्थिती
या प्रेरणादायी कार्यक्रमास एकलव्य विद्या संकुलाचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे यांच्यासह अण्णासाहेब कोल्हटकर, अशोक बनकर, संतोष बनसोडे, अनिल घुगे, अण्णासाहेब मगर, माधव पाटील, शितोळे सर, हरीश मगदूम, खंडू काळे, प्रणिता शेटकार, निर्मला हुग्गे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments