Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पांगरदरवाडी येथे 'आपले सरकार सेवा केंद्रा'तर्फे पानपोईचा शुभारंभ; वाढत्या उन्हात नागरिकांना दिलासा

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपत ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या वतीने ग्रामस्थ आणि प्रवाशांसाठी मोफत पानपोई सुरू करण्यात आली आहे. हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले असून, यामुळे रणरणत्या उन्हात नागरिकांना थंड पाण्याचा आधार मिळाला आहे.

सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने गावातील नागरिक, शेतकरी आणि कामानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची पाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. ही गरज ओळखून ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ने पुढाकार घेत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी ही पानपोई कार्यान्वित केली आहे. येथे दिवसभर स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले आहे. "सेवा केंद्राने केवळ शासकीय कामापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यात सहभाग नोंदवून एक आदर्श निर्माण केला आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

मान्यवरांची उपस्थिती:
या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नागरिक बिभीषण शिंदे, माणिक सावंत, सुनील जाधव, सत्यवान शिंदे, महादेव सावंत, सोमनाथ डोंगरे, सोमनाथ शिंदे, गणेश गायकवाड यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments