"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात आज भक्तीचा एक अनोखा आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. पाथरी (जि. परभणी) येथील देवीचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी तब्बल सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली.
आज सकाळी कुटुंबियांसह मंदिरात दाखल झालेल्या कुलकर्णी यांनी अत्यंत भक्तीभावाने देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी चांदीची कळशी अर्पण करत आपली श्रद्धा व्यक्त केली. या घटनेमुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये चर्चेला उधाण आले.
यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा हा अनोखा संगम पाहून उपस्थित भाविकही भारावून गेले.
0 Comments