Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

किल्लेज येथे 'शिंदे सर' आणि 'जाधव सर' यांचा सेवापूर्ती सोहळा; मान्यवरांची राहणार उपस्थिती

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, किल्लेज येथील दोन आदर्श शिक्षक श्री. शिंदे सर आणि श्री. जाधव सर यांचा प्रदीर्घ सेवेनंतरचा सेवानिवृत्ती गौरव अर्थात 'सेवापूर्ती सोहळा' उद्या, सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

शिक्षण क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल या दोन्ही गुरुवर्यंचा सन्मान करण्यासाठी केंद्र किल्लेज परिवाराच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने:

श्री. अशोक खुळे साहेब (मा. गटशिक्षणाधिकारी, परांडा)

श्री. यशवंत चव्हाण साहेब (मा. गटशिक्षणाधिकारी, तुळजापूर)

श्री. महेश लांडगे साहेब (पोलीस निरीक्षक, परभणी)

श्री. अभिमन्यू पवार साहेब (आमदार, औसा)

कार्यक्रमाचा तपशील:
वेळ: सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता.

स्थळ: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, किल्लेज.

निमंत्रक: केंद्र किल्लेज आणि शुभेच्छुक परिवार.

दशकांहून अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या या शिक्षकांच्या निवृत्तीनिमित्त ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Only न्युज धाराशिव
अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा 'Only न्यूज धाराशिव'.

Post a Comment

0 Comments