Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न; ६०० नागरिकांची तपासणी, ९५ जणांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी या उद्देशाने, बालाजी अमाईन्स लि., रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तामलवाडी येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात पार पडले.

या शिबिराचा तामलवाडीसह परिसरातील सुमारे ६०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यामध्ये तपासणीअंती ९५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले, तर ४५० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
बालाजी अमाईन्सच्या सीएसआर (CSR) फंडातून या शिबिरासाठी विशेष मदतनिधी उपलब्ध करून देण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा रोटे धनश्री केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अशाच प्रकारे विविध संस्थांनी एकत्र येऊन समाजासाठी उपयुक्त कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराप्रसंगी तामलवाडी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. गोकुळ ठाकूर, बालाजी अमाईन्सचे सीएसआर प्रमुख अनिल विपत, माजी सरपंच दत्तात्रय पडणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य यशवंत लोढे, त्रंबकेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसवण्णप्पा मसुदे, बालाजी अमाईन्सचे जनरल मॅनेजर आर. सुब्बाराव शास्त्री, ज्ञानेश्वर माळी, सुधीर पाटील, सुधीर गायकवाड, मारुती पाटील, शिवदास पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे डॉ. सुधीर सुधाळ आणि त्यांच्या टीमने रुग्णांची सखोल तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे सर यांनी केले.

"गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देणे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. ग्रामीण भागातील लोकांसाठी हा उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरला आहे."

शिबिराच्या यशासाठी परिश्रम
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख मितेश पंचमिया, शांता येळंबकर, संजय मडूर, डॉ. राजीव मोहोळकर, आनंद गुंड्याल, विशाल वर्मा यांनी सहकार्य केले. तसेच बालाजी अमाईन्सचे मारुती सावंत, सर्जेराव गायकवाड, राहुल गुंड, दत्तप्रसाद सांजेकर, सचिन मोरे, ज्ञानेश्वर घोटकर, अमोल गुंड, बसवराज अंटद, महेश पवार व सिंधू सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची  व विश्वासार्ह बातमी!

Post a Comment

0 Comments