Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या सहसचिवपदी(सर्वसाधारण) ॲड. संजय भोरे यांची बिनविरोध निवड.

धाराशिव: धाराशिव क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ॲड. संजय भोरे यांची जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या सहसचिव (सर्वसाधारण) पदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने वकील वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, समाजाच्या सर्वस्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनमिळावू व सर्वसमावेशक वृत्तीचा विचार करून वकील बांधवांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. 

आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ॲड. भोरे म्हणाले की, "जिल्ह्यातील वकील बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विधिज्ञ मंडळाच्या बळकटीकरणासाठी मी कटिबद्ध राहीन. ज्येष्ठ वकीलांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुण सहकाऱ्यांच्या सोबतीने बार असोसिएशनचे कामकाज अधिक गतिमान करण्याचा माझा मानस आहे."

या निवडीबद्दल जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ वकीलांसह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ॲड. संजय भोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments