"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्रसिद्ध व्यावसायिक डॉ. रविकांत गुरव यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जात आहे. सरस्वती मंगल सेवा केंद्राच्या यशस्वी घौडदौडीनंतर, आता गुरव परिवारातर्फे 'सरस्वती मंगल भांडार, डेकोरेशन व कॅटरिंग' या नवीन व्यवसायाचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे.
तामलवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी एकाच छताखाली मंगल कार्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि उत्कृष्ट केटरिंग सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस डॉ. गुरव यांनी व्यक्त केला आहे.
शुभारंभ सोहळा:
दिनांक: शुक्रवार, २४ एप्रिल २०२६
वेळ: सायंकाळी ६:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत
स्थळ: सरस्वती मंगल कार्यालय, तामलवाडी
या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्यास तामलवाडीसह तुळजापूर तालुक्यातील मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन डॉ.रविकांत गुरव व
'गुरव परिवार, तामलवाडी' यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments