Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर मध्ये परप्रांतीय व बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाईची मागणी; मनसेचा पोलिसांना इशारा

 "Only न्यूज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने तुळजापूर शहर व तालुक्यात वाढलेल्या परप्रांतीय नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात आणि अनधिकृत व्यवसायांविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक, तुळजापूर पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.

मनसेचे शहराध्यक्ष अविनाश (आप्पा) पवार यांच्या लेटर पॅडवर (पत्रकावर) दिलेल्या 
निवेदनात म्हटले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय व्यक्ती कोणतीही वैध कागदपत्रे, पोलिस पडताळणी किंवा स्थानिक प्रशासनाची नोंद न करता वास्तव्यास आहेत. हे नागरिक हॉटेल्स, खानावळी, बांधकाम साईट तसेच फेरी व्यवसायामध्ये अनधिकृतरीत्या कार्यरत असून रस्त्यावर ठेले लावून व्यवसाय करत आहेत. यासोबतच, अनेक घरमालकांकडून पोलिस पडताळणी न करता भाड्याने घरे देण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच काही ठेकेदारांकडून विना नोंदणी आणि परवाना कामगारांना रोजगार देत कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता, नागरिकांच्या सुरक्षेला धोका, स्थानिक युवकांच्या रोजगारावर परिणाम, तसेच अस्वच्छ अन्न विक्रीमुळे आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मनसेने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१)सर्व परप्रांतीयांची पोलिस पडताळणी मोहीम राबवावी
बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्यांवर कारवाई करावी
अनधिकृत कामगार व त्यांना रोजगार देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत
२)फेरी व्यवसायातील बेकायदेशीर गाड्या जप्त कराव्यात
३)पोलिस पडताळणीशिवाय घरे भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करावी
४)पोलीस, नगरपालिका, कामगार विभाग व अन्न-औषध प्रशासन यांचे संयुक्त पथक नेमावे

दरम्यान, या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments