Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वादळानंतरचा 'आनंदोत्सव'! तुळजापुरातील 'अयोध्या नगरी'त महेश-ऋतुजा यांचा बहारदार 'थँक्सगिव्हिंग' सोहळा; फटाक्यांची आतिषबाजी अन् डान्सने रंगली मैफल​; पुजारी-रोचकरी परिवाराकडून पाहुण्यांचे आभार; नगराध्यक्षांसह दिग्गजांची उपस्थिती, वर-वधू पित्यांचाही डान्समध्ये सहभाग

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
​तुळजापूर | उमाजी गायकवाड
​तुळजापूर: भक्ती, शक्ती आणि जिद्दीचा एक अभूतपूर्व इतिहास मंगळवारी तुळजापूरच्या भूमीत लिहिला गेला. आदल्या दिवशी मुसळधार पावसाने 'अयोध्या नगरी'तील शाही सोहळ्यात विरजण घातले असले तरी, पुजारी बंधूंच्या 'राम-लक्ष्मण' जोडीने निसर्गाच्या आव्हानावर मात करत 'वंश पॅलेस'मध्ये हा सोहळा दिमाखात पार पाडला. या ऐतिहासिक विजयाचा आणि संघर्षात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानण्याचा एक अनोखा 'आनंदोत्सव' बुधवारी सायंकाळी पुन्हा त्याच 'अयोध्या नगरी'त रंगला.

​फटाक्यांची आतिषबाजी अन् 'सेल्फी'चा महापूर
बुधवारी सायंकाळी ८ वाजता अयोध्या नगरीचा सेट पुन्हा एकदा ७०० फोकसच्या झगमगाटात उजळून निघाला. आदल्या दिवशी पावसामुळे राहून गेलेले फोटोशूट पूर्ण करण्यासाठी नवदाम्पत्य चि. महेश आणि चि.सौ.का. ऋतुजा यांच्यासह नातेवाईक आणि मित्र परिवाराने एकच गर्दी केली होती. नेत्रदीपक फटाक्यांच्या आतिषबाजीने तुळजापूरचे आकाश उजळून निघाले, ज्याने उपस्थितांचे डोळे दिपून गेले.

​नाचो रे नाचो: वर-वधू पित्यांचाही ठेका
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे हिंदी आणि मराठी गाण्यांवर झालेला बहारदार डान्स. गणेश आणि महेश या 'राम-लक्ष्मण' जोडीच्या मित्र परिवाराने डान्स फ्लोअर दणाणून सोडला. विशेष म्हणजे, या आनंदात स्वतः वर बंधू गणेश पुजारी, वर पिता विश्वनाथ पुजारी आणि वधू पिता अनिल रोचकरी यांनीही सहभाग घेतला. या तिन्ही दिग्गजांना डान्स करताना पाहून मित्र परिवार आणि नातेवाईकांचा उत्साह द्विगुणित झाला आणि सर्वांनी एकत्रितपणे ठेका धरला. या क्षणी चि. महेश आणि ऋतुजा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

​जिद्दीच्या 'पॅटर्न'ची जिल्हाभर चर्चा
१९ एप्रिलला वादळाने सेट पाडला, तो गणेश पुजारींनी २४ तासात उभा केला. पुन्हा २१ ला पावसानं व्यत्यय आणला, तरीही डगमगून न जाता त्यांनी हा सोहळा यशस्वी केला. दुसऱ्या दिवशीही तितक्याच जोशात सर्वांचे आभार मानून स्नेहभोजनाची व्यवस्था केली. त्यांच्या या अकल्पनीय जिद्दीची आणि भावाप्रती असलेल्या प्रेमाची चर्चा आता संपूर्ण जिल्हाभर रंगली आहे.

या कार्यक्रमा विषयी व पुजारी बंधूंच्या जिद्दी विषयी खास बातचीत करताना नगरसेवक सज्जनराव (मामा) साळुंके म्हणाले की,​ "संकटं येतात तेव्हा माणसाचा संयम आणि जिद्द दोन्हीची परीक्षा असते. पुजारी परिवाराने आणि विशेषतः गणेश पुजारी यांनी ज्या पद्धतीने निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ही 'अयोध्या नगरी' पुन्हा उभी केली, ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. हा केवळ एक विवाह सोहळा नसून, पुजारी आणि रोचकरी परिवाराच्या एकीचे आणि संघर्षाचे प्रतीक असल्याचे सांगून त्यांनी या नवदाम्पत्याला पुढील सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या!"

दिग्गजांची उपस्थिती
या आभार प्रदर्शन कार्यक्रमास नगराध्यक्ष विनोद (पिटू भैय्या) गंगणे, नगरसेवक सज्जनराव साळुंके, नगरसेवक विशाल भैय्या रोचकरी, माजी नगरसेवक अमर भैय्या मगर, अमर दाजी हंगरगेकर,धनंजय पाटील,सतिश खोपडे यांसारख्या दिग्गज मान्यवरांसह महिला वर्ग, मित्र परिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​विवाह सोहळा एक नजर:
​नवदाम्पत्य: चि. महेश विश्वनाथ पुजारी, तुळजापूर आणि चि.सौ.का. ऋतुजा अनिल रोचकरी, तुळजापूर
​मुहूर्त: मंगळवार, २१ एप्रिल २०२६ (वंश पॅलेस)

​निसर्गाच्या आव्हानावर जिद्दीने मात करून संपन्न झालेला हा 'अयोध्या नगरी'तील विवाह सोहळा तुळजापूरकरांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहील.

​दोन्ही मुलांच्या जिद्दीचे कौतुक 
​"निसर्गाने परीक्षा घेतली, पण माझ्या दोन्ही मुलांनी (गणेश आणि महेश) आणि रोचकरी परिवाराने दाखवलेली जिद्द कौतुकास्पद आहे. एका बाजूला वादळानं सेट पाडला, तरी गणेशने तो जिद्दीनं पुन्हा उभा केला आणि पावसातही महेशने संयम राखत कार्य पूर्ण केले. संकटावर मात करून कार्य कसं सिद्धीस न्यावं, हे या दोघांनी दाखवून दिलं."
— विश्वनाथ पुजारी (वर पिता)

जावायांच्या जिद्दीमुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला 
​"माझ्या जावयांनी निसर्गाच्या अवकृपेला तोंड देऊन जे धाडस दाखवले, ते खरंच अभिनंदनीय आहे. गणेशने आपल्या भावासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि महेशनेही ऐन पावसात संयम राखला. या दोघांच्या जिद्दीमुळेच हा सोहळा ऐतिहासिक ठरला."
— अनिल रोचकरी (वधू पिता)

हा जिद्दीचा विजयोत्सव
​"प्रभू श्रीराम आणि आई भवानीच्या दरबारात महेश-ऋतुजा विवाहबद्ध झाले आहेत. निसर्गाचे आव्हान मोठे होते, पण पुजारी परिवाराची जिद्द त्याहून मोठी ठरली. आजचा हा थँक्सगिव्हिंग सोहळा आणि 'अयोध्या नगरी'चा हा झगमगाट त्यांच्या जिद्दीचा विजयोत्सव आहे."
— विनोद पिटू भैय्या गंगणे (नगराध्यक्ष, तुळजापूर)

सामाजिक बांधिलकी जपणारे पुजारी बंधू 
​"पुजारी परिवाराचा हा जिद्दीचा 'पॅटर्न' तुळजापुरात प्रदीर्घ काळ स्मरणात राहील. संकटातही सामाजिक बांधिलकी जपत यमगरवाडीतील विद्यार्थ्यांना भोजन देणे, हे त्यांच्या मोठ्या मनाचे लक्षण आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होता आल्याचा आनंद आहे."
— अमर भैय्या मगर (माजी नगरसेवक, तुळजापूर)
आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच आम्ही निसर्गाच्या संकटांवर मात करु शकलो 
"आम्ही जे काही केले, ते फक्त आणि फक्त माझ्या धाकट्या भावाच्या आनंदासाठी. वादळ असो की पाऊस, आई भवानीच्या आशीर्वादाने आम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकतो, हा विश्वास होता. या संघर्षात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठीच आजचा हा आनंदोत्सव आहे."
— गणेश पुजारी (वर बंधू, अध्यक्ष - पुजारी नगर फाऊंडेशन)

​'Only न्युज धाराशिव' - थेट, सत्य आणि सर्वात जलद!

Post a Comment

0 Comments