धाराशिव: "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
सध्या संपूर्ण राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरण गाजत असून, या प्रकरणात अनेक बड्या राजकारण्यांचा सहभाग आणि पाठबळ असल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'कायदा आणि राजकारणातील भोंदूगिरी' नेमकी काय असते आणि त्यातील कायदेशीर गुंतागुंत काय आहे, हे उलगडण्यासाठी प्रसिद्ध संविधान व नागरी हक्क विश्लेषक ॲड.असीम सुहास सरोदे यांचे विशेष व्याख्यान धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शुक्रवार, दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद जवळ, धाराशिव येथे संपन्न होणार आहे.
कायदेशीर बाबींवर होणार प्रहार
राजकीय वरदहस्तामुळे फोफावणारी भोंदूगिरी आणि सामान्यांची होणारी फसवणूक यावर अॅड. असीम सरोदे आपले परखड विचार मांडणार आहेत. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थयाने कायद्याची भूमिका काय असावी, याबद्दलचे सखोल मार्गदर्शन या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला आहे. या जनजागृतीपर कार्यक्रमास धाराशिवकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड.रवींद्र मैंदाड, ॲड. देविदास वडगावकर आणि महाराष्ट्र अंनिस जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची थोडक्यात माहिती:
विषय: कायदा आणि राजकारणातील भोंदूगिरी
प्रमुख वक्ते: ॲड. असीम सुहास सरोदे
वेळ: शुक्रवार, ३ एप्रिल | सायंकाळी ५ वा.
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद जवळ, धाराशिव
✍️ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा 'Only न्यूज धाराशिव'
0 Comments