धाराशिव | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
युवा पिढी व्यसनाधीन होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आज दि. 4/7/2026 रोजी येडशी येथील जनता महाविद्यालय येथे _नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम_ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील 700 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, 4 प्राध्यापक आणि 20 शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना गांजा, अफू, ड्रग्स आणि नशेच्या गोळ्यांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर माहिती देऊन व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रम माननीय श्री. साईनाथ ठोंबरे साहेब, डी.वाय.एस.पी. आणि पोलीस निरीक्षक सौ. गीता बागवडे मॅडम, सपोनी सौ. दिपाली पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे यांनी केले.
नशामुक्त समाज घडवण्यासाठी पोलिस आणि शिक्षण संस्थांनी घेतलेला हा पुढाकार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
0 Comments