Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🔥 तुळजापूर हादरले! पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; १३ जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
 गुरुवार, दि. २३ रोजी तुळजापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवून तब्बल १३ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिसाळलेला कुत्रा कमानवेस परिसरात फिरत होता. याच भागातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक नागरिकांना त्याने चावा घेतला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

जखमींना तात्काळ तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वांवर प्राथमिक उपचार करून अँटी-रेबीज लसीकरण केले असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित कुत्र्याचा शोध घेऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, तुळजापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर ही गंभीर समस्या बनत चालली आहे. विशेषतः शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री फिरत असल्याने रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना बाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे.

फक्त कुत्र्यांचाच नव्हे तर भटक्या जनावरांचाही वावर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments