Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

“जयंतीत दिखाव्याला फाटा; सामाजिक बांधिलकीतून बेबी किट व फळवाटपातून महापुरुषांना अभिवादन” लोककल्याणाच्या ध्येयातून जयंती साजरी; तुळजापूरात स्तुत्य पुढाकार

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, तथागत गौतम बुद्ध आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत जयंती साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून लोककल्याणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. ३० एप्रिल २०२६ रोजी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात नवजात शिशूंना उपयुक्त बेबी किट तसेच रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. “महापुरुषांच्या विचारांची जयंती म्हणजे लोककल्याणाची जयंती” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन रिपाइं युवक तालुकाध्यक्ष शुभम कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्र जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी कै. साहेबराव हंगरगेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मरळ तसेच नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय साळुंके यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास डॉ. एडके, डॉ. राठोड, डॉ. स्वामी, डॉ. गडेकर, डॉ. हिराळे, अधिसेविका स्वाती जाधव, अर्चना डोके, राहुल पवार, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, तालुका उपाध्यक्ष किसन पांडगळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष लहु घोडके, लोकमान्य युवामंचचे अध्यक्ष शशिकांत मुळे, तालुका सचिव सुरेंद्र सुर्यवंशी, दीपक ओव्हाळ, विलास माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments