Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडीतील कंपन्यांत भूमिपुत्रांनाच प्राधान्य द्या; अन्यथा कारवाई करा!माजी सैनिक शिवाजी सावंत यांची प्रशासनाकडे मागणी; स्थानिकांऐवजी परप्रांतीयांना संधी मिळत असल्याचा आरोप

" Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | विशेष प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या तामलवाडी परिसरातील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासाठी प्राधान्य मिळावे, अशी आग्रही मागणी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी केली आहे. ज्या कंपन्या स्थानिक तरुणांना डावलून परप्रांतीयांना संधी देत आहेत, त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या चार दशकांपासून तामलवाडी (ता. तुळजापूर) परिसरात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या सुरू होत असताना स्थानिक ग्रामपंचायतीने आरोग्याचा धोका पत्करून आणि कोणत्याही अटी न लादता 'ना हरकत प्रमाणपत्र' दिले होते. त्यामागे मुख्य उद्देश हाच होता की, परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल, शेतकऱ्यांच्या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळेल आणि लोकांचे राहणीमान सुधारेल. मात्र, सद्यस्थितीत हे चित्र पूर्णतः उलट दिसत असल्याचे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

परप्रांतीय कामगारांचा भरणा
आज तामलवाडीतील बहुतांश कंपन्यांमध्ये परराज्यातील कामगारांचा मोठ्या प्रमाणावर भरणा करण्यात आला आहे. लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून परप्रांतीयांना कामावर घेतले जात असल्याने, येथील उच्चशिक्षित भूमिपुत्रांवर नोकरीसाठी मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. ही बाब स्थानिक विकासाच्या दृष्टीने खेदजनक असल्याचे सावंत यांनी नमूद केले.

प्रशासनाने सक्तीचा ठराव करावा
शिवाजी सावंत यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तुळजापूरचे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती केली आहे की, तामलवाडी परिसरातील प्रत्येक कंपनीत शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक भूमिपुत्रांनाच रोजगाराची सक्ती करण्यात यावी. जे कारखाने किंवा कंपन्या या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर शासकीय स्तरावरून कारवाईचा बडगा उगारण्यात यावा.

या मागणीला परिसरातील शेतकरी आणि बेरोजगार तरुणांनी मोठा पाठिंबा दर्शविला असून, या मुद्द्यावर सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक तरुणांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शिवाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments