Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेचे सहशिक्षक सुनील खेंडाड गुरुजींचा ३० जून रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा! राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची लाभणार प्रमुख उपस्थिती; संस्था अध्यक्ष मनोहर सपाटे अध्यक्षस्थान भूषविणार


"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ सेवेने आदर्श निर्माण करणारे, मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित येडेश्वरी कन्या प्रशाला काटी येथील कर्तव्यदक्ष सहशिक्षक श्री. सुनील बाबुराव खेंडाड (सर) हे येत्या ३० जून २०२६ रोजी आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या अध्यापन कौशल्याने आणि प्रेमळ स्वभावाने हजारो विद्यार्थिनींचे भविष्य घडवणाऱ्या खेंडाड सरांच्या या प्रदीर्घ सेवागौरवाप्रित्यर्थ मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता भव्य 'सेवापूर्ती गौरव सोहळा' आयोजित करण्यात आला आहे.

हा कृतज्ञता सोहळा येडेश्वरी कन्या प्रशाला काटी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. मनोहर गणपत सपाटे (साहेब) उपस्थित राहणार आहेत. तर हा सोहळा तुळजापूर पंचायत समितीचे कार्यक्षम सभापती मा. श्री. विक्रमसिंहजी देशमुख आणि तुळजापूरचे माजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अर्जुन मारुती जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

श्री. सुनील खेंडाड सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला गती देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या या निस्पृह सेवेचे ऋण व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर साक्षीदार होणार आहेत.

या सोहळ्यासाठी जि.प. सदस्य मा. श्री. बाळासाहेब भाले, मा. श्री. सुनील बनसोडे, काटीचे सरपंच मा. श्री. सुजित हंगरकर, जनरल सेक्रेटरी मा. श्री. महेश माने, शालेय समिती चेअरमन मा. श्री. शिवदास चटके, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार मा. श्री. उमाजी गायकवाड, उपसरपंच मा. श्री. अनिल बनसोडे, मा. श्री. चंद्रकांत काटे यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या भावनिक सेवापूर्ती सोहळ्यासाठी काटी व तुळजापूर परिसरातील सर्व नागरिकांनी अगत्यपूर्वक व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक श्री. किशोर बनसोडे आणि शाळा व्यवस्थापन समिती, येडेश्वरी कन्या प्रशाला काटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments