Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नांदुरी येथे दलित व धनगर वस्तीत सभामंडप उभारण्याची जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी; १५ व्या वित्त आयोगातून अथवा समाजकल्याण विभागातून निधी देण्याची विनंती; मंगरुळ गटाच्या सदस्या सीमाताई माडजे यांनी दिले धाराशिव जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन


'Only  न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील मौजे नांदुरी येथील दलित वस्ती आणि धनगर वस्तीमध्ये ग्रामस्थांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तात्काळ दोन स्वतंत्र सभामंडप मंजूर करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी मंगरुळ जिल्हा परिषद गटाच्या समाजवादी पार्टीच्या सदस्या सौ. सीमाताई भैरवनाथ माडजे-रोचकरी यांनी केली आहे. या संदर्भातील सविस्तर मागणीचे निवेदन त्यांनी आज धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) प्रत्यक्ष भेट घेऊन सुपूर्द केले.

मौजे नांदुरी हे गाव मंगरुळ जिल्हा परिषद गटामध्ये येत असून, या गावातील दलित वस्ती आणि धनगर वस्ती येथील नागरिकांना विविध सार्वजनिक कार्यक्रम, बैठका व सामाजिक उपक्रमांसाठी हक्काच्या जागेची म्हणजेच सभामंडपाची तीव्र गरज आहे. ही अडचण ओळखून जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे यांनी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, नांदुरी गावातील दोन्ही समाज बांधवांसाठी जिल्हा परिषद सदस्य निधी, १५ वा वित्त आयोग अथवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून प्रत्येकी १०-१० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. या निधीतून दोन्ही वस्त्यांमध्ये सुसज्ज सभामंडप उभारले जावेत.

या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ अंदाजपत्रक (Estimate) तयार करावे, तसेच या कामांना आवश्यक असणारी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन तात्काळ सभामंडपाचे बांधकाम सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी प्रशासनाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सभामंडपाच्या या मागणीमुळे नांदुरी येथील दलित व धनगर समाजातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, या कामाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

"नांदुरी गावातील दलित व धनगर वस्तीतील नागरिकांची सभामंडपाची मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती. समाजातील सर्व घटकांना हक्काची जागा आणि पायाभूत सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या दोन्ही सभामंडपांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन कामाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळावी, यासाठी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे."
— सौ. सीमाताई भैरवनाथ माडजे-रोचकरी > (जिल्हा परिषद सदस्या, मंगरुळ जिल्हा परिषद गट, समाजवादी पार्टी)

Post a Comment

0 Comments