"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. श्री. कीर्ती किरण पुजार यांनी आज सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी लीन होत भक्तिभावाने दर्शन घेतले. अधिक मासाचे औचित्य साधत जिल्हाधिकाऱ्यांनी देवीची महाआरती केली, तसेच सपत्नीक श्री देवीची खण-नारळाने ओटी भरून आशीर्वाद घेतले.
विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा
दर्शन सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी मंदिर प्रशासकीय भूमिकेतून मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची बारकाईने पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने मंदिर परिसरात सुरू असलेली जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
सुविधांचा आढावा: तुळजापुरात येणाऱ्या भाविक-भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.
संवर्धन कार्य: ऐतिहासिक मंदिराचे मूळ वैभव टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या संवर्धन कामांचा आढावा घेतला.
याप्रवेळी भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वरिष्ठ अधिकारी, पुजारी मंडळी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments