Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर प्रशासनाचा चाप; १८ जणांकडून ९ हजारांचा दंड वसूल; मंदिर परिसराच्या पावित्र्यासाठी कठोर पाऊल; 'थुंकणाऱ्यांना माफी नाही'; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची दंडात्मक कारवाई

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड
 श्री तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

संबंधितांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याबाबत मंदिर संस्थानकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही काही व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले होते. 

या प्रकाराची गंभीर दखल घेत मंदिर संस्थान प्रशासनाने अशा कृत्यांविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच पुजाऱ्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता आणि पावित्र्य जपण्यासाठी सहकार्य करावे, परिसरात कोठेही थुंकू नये आणि स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

मंदिर परिसरातील स्वच्छता अबाधित राखण्यासाठी पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments