Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आपलं हरित धाराशिव'चा स्तुत्य उपक्रम; बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न!...तरच भावी पिढीला ऑक्सिजन मिळेल; प्रत्येकाने किमान एक झाड लावून जगवण्याचा नगराध्यक्षा नेहाताई काकडे यांचा आग्रह

Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
धाराशिव | प्रा.अभिमान हंगरगेकर 
बल वॉर्मिंगच्या काळात पर्यावरण समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात केवळ झाड लावून न थांबता, ते जगवून त्याचे संवर्धन केले पाहिजे. झाडे जगली तरच मानवी जीवन सुसह्य होईल आणि भावी पिढीला शुद्ध ऑक्सिजन मिळेल, असे प्रतिपादन धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे यांनी केले.

शहरातील युवा नेते सुमित चंद्रकांत बागल यांच्या संकल्पनेतून आणि मित्रपरिवाराच्या सहकार्यातून नव्याने स्थापन झालेल्या 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाउंडेशन'च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार (दि. ५ जून) रोजी धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

फाउंडेशनचा उद्देश कौतुकास्पद: सुमित बागल
कार्यक्रमाच्या सुरुवातीला फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित बागल यांनी प्रास्ताविक केले. धाराशिव शहर हिरवेगार करणे आणि वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची चळवळ लोकचळवळ बनवणे, याच हेतूने या फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संकल्पनेचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.

मान्यवरांकडून वृक्ष संवर्धनाचे आवाहन
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजाभाऊ पाटील व ज्येष्ठ पत्रकार प्रा. अभिमान हंगरगेकर यांनी आपल्या मनोगतातून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विषद केले. केवळ शासकीय पातळीवर नाही, तर सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत अशा मोहिमा राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे!
"पर्यावरणाचा ढासळता समतोल ही चिंतेची बाब आहे. सुमित बागल आणि त्यांच्या टीमने सुरू केलेले 'आपलं हरित धाराशिव' हे अभियान कौतुकास्पद असून, शहरातील प्रत्येक नागरिकाने यात खारीचा वाटा उचलत किमान एक झाड लावून ते जोपासावे."
— सौ. नेहाताई राहुल काकडे (नगराध्यक्षा, धाराशिव)

मान्यवरांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती राजाभाऊ पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, उपसभापती शेषराव चव्हाण, नगर परिषदेचे बांधकाम सभापती अभिजित काकडे, पाणीपुरवठा समिती सभापती विलास लोंढे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, नगरसेवक राहुल काकडे, बापू पवार, अशोक चव्हाण, नरसिंह मेटकरी आणि सुनील आंबेकर आदी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच सामाजिक दायित्व म्हणून 'इक्विटास बँके'चे अविनाश गायकवाड व त्यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाला हजेरी लावली. व्यापार समूहातील अतुल शेरकर, आनंद जगदाळे, अभिषेक बागल, रोहित बागल, बाजार समितीचे सचिव पवन माकोडे, अरुण माने, बप्पा पडवळ, श्रीकांत तट, श्री. निपाणीकर यांच्यासह शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची यशस्वी सांगता
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाउंडेशन'चे सचिव प्रमोद हुग्गे, कार्याध्यक्ष अमरसिंह गोरे, सदस्य नसिरभाई शेख, महेश उंबरे व धीरज मोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन भालचंद्र कोकाटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments