Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

"प्रतिकूलतेवर मात करत घडलेला जीवनप्रवास... प्रेरणादायी ‘विठ्ठलवारी’चा भव्य गौरव सोहळा! "आत्मसंघर्षातून साकारलेली प्रेरणादायी गाथा: विठ्ठल दादा गारडे यांच्या ‘विठ्ठलवारी’ ग्रंथाचे पुण्यात दिमाखदार प्रकाशन

धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा विशेष बातमी 
संघर्ष, अपार कष्ट, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा एक अभूतपूर्व आदर्श उभा करणाऱ्या श्री. विठ्ठल दादा गारडे यांच्या ‘विठ्ठलवारी’ या बहुचर्चित आत्मचरित्रात्मक ग्रंथाचा भव्य आणि दिमाखदार प्रकाशन सोहळा नुकताच पुण्याच्या ऐतिहासिक महाराष्ट्र साहित्य परिषदेत अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात पार पडला. जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करत उभा राहिलेला हा प्रेरणादायी प्रवास केवळ एका ग्रंथाचे प्रकाशन न ठरता, संघर्षाचा गौरव करणारा अविस्मरणीय उत्सव ठरला.

‘विठ्ठलवारी’ हा संघर्षातून साकारलेला जीवनमूल्यांचा दस्तऐवज: मान्यवरांचे प्रतिपादन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार मा. योगेश अण्णा पुंडलिक टिळेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप शेठ राऊत, ज्येष्ठ साहित्यिक व आचार्य अत्रे साहित्याचे अभ्यासक मा. श्याम भुरके, पुणे मनपाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती रंजनाताई टिळेकर, माजी महापौर सौ. वैशालीताई बनकर आणि महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री. हनुमंत सुदाम टिळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मान्यवरांनी, "‘विठ्ठलवारी’ हा केवळ एक शब्दरूपी ग्रंथ नसून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभ्या राहिलेल्या जीवनमूल्यांचा, विठ्ठलभक्तीचा आणि सकारात्मक दृष्टीचा एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे,"अशा शब्दांत लेखकाच्या जीवनप्रवासाचा आणि ग्रंथाचा विशेष गौरव केला.

साहित्य, समाज आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि उद्योजकता क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ज्ञानसूर्य प्रकाशनाचे संचालक श्री. मारुती जयश्री नामदेव माळी, वीरपत्नी सौ. उमा लतिका उत्तम काळे-माळी, मोहोळच्या उद्योजिका सौ. उज्वला विठ्ठल माळी, मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. भैरवनाथ माळी, डॉ. पांडुरंग गाडेकर, डॉ. चांगदेव पिंगळे, मा. सुनील दादा बनकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

ग्रंथनिर्मितीचा प्रवास आणि समीक्षा
ज्ञानसूर्य प्रकाशनाचे संचालक श्री. मारुती जयश्री नामदेव माळी यांनी ‘विठ्ठलवारी’ या ग्रंथाच्या निर्मितीमागील भूमिका आणि लेखकाच्या संघर्षाची गाथा विषद केली. ज्ञानसूर्य प्रकाशनाची साहित्य क्षेत्रातील वाटचाल आणि समाजाभिमुख साहित्याचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडले.

मुंबईवरून ज्येष्ठ समीक्षक श्री. अनिल तावडे यांनी पाठवलेल्या समीक्षेचे अभिवाचन कु. स्वप्नाली गारडे यांनी केले.

अतिशय देखणा आणि ओघवता सोहळा
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राधाताई बेळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. सौ. रूपाली गारडे यांनी सर्व अभ्यागतांचे शब्दसुमां नी स्वागत केले. डॉ. प्रा. उमाताई काळे-माळी यांनी आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत सूत्रसंचालन करून संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. रुपालीताई गारडे यांनी मानले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गारडे परिवारातील श्री. संदीप गारडे, श्री. सागर गारडे, त्यांची मुले, मुली, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित रसिकांनी या ग्रंथाचे आणि लेखकाचे भरभरून कौतुक करत ‘विठ्ठलवारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments