Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सांगवी काटी झोपडपट्टीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण; महिलांना वडाच्या रोपांचे वाटप

"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी झोपडपट्टी येथे सामाजिक वन परिक्षेत्र कार्यालय तुळजापूरच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

‘फेऱ्या वडाच्या, बंध नात्याचे’ या विषयावर प्रबोधन 
वनपरिक्षेत्र अधिकारी जी. के. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. एस. साळवे यांनी महिलांना वटपौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले. "वडाचे झाड दीर्घायुषी असून ते पर्यावरणाचा समतोल राखते. वटपौर्णिमा म्हणजे केवळ वडाला फेऱ्या मारणे नव्हे, तर नात्यांसोबतच निसर्गाशीही बंध जोडणे होय," असे साळवे यांनी सांगितले. 

रोपवाटिकेतून वडाच्या रोपांचे वाटप 
यावेळी सुवासिनी महिलांना जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील महिलांना येथील रोपवाटिकेतून वडाची रोपे मोफत वाटप करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवर  
कार्यक्रमास राधा भुईकर, शोभा माळी, वंदना माळी, चंद्रकला शिंदे, ऋतुजा माळी, रागिनी शिंदे, कुसुम शिंदे, नंदा मगर, दीपाली मगर, अर्चना भुईकर, जना भुईकर, आशा काशीद, वैशाली सुरवसे तसेच साधू शिंदे, मारुती मगर, उमेश शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments