Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील कन्या समीक्षा जयदेव म्हमाणे हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. तिची 'UWW Asian Pankration & Amateur MMA Championships 2026' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ती -५० किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
समीक्षा ही सुवर्णपदक विजेते खेळाडू जयदेव म्हमाणे यांची कन्या आहे. वडिलांचा क्रीडा वारसा समर्थपणे पुढे चालवत तिने अत्यंत कमी वयात कठोर परिश्रमांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिची ही निवड वडगाव (काटी) साठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
समीक्षाच्या या निवडीबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी आशियाई स्पर्धेसाठी ती पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाली आहे. समीक्षाचे हे यश गावातील इतर तरुण मुला-मुल्हींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तिने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकवावा, हीच सदिच्छा.
0 Comments