Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपर जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे रुजू; तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मिळणार गती

Only न्यूज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाची सूत्रे अपर जिल्हाधिकारी श्री. उपेंद्र गोविंद तामोरे यांनी मंगळवारी (दि. २ जून) अधिकृतपणे स्वीकारली. राज्य शासनाने तुळजापूरसाठी मंजूर केलेल्या कोट्यवधींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर तामोरे यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील मानली जात आहे.

प्रदीर्घ प्रशासकीय रचनेचा दांडगा अनुभव
नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे हे सन २००२ च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी असून, त्यांना महसूल, नियोजन आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ व विविधांगी अनुभव आहे. मंदिर संस्थानमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी ते मुंबईतील अंधेरी येथील 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ' (MIDC) मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) म्हणून कार्यरत होते. आपल्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी सुशासन, पारदर्शकता, विकासाभिमुख नियोजन आणि लोकाभिमुख प्रशासनाचा ठसा उमटवला आहे.

विकास आराखड्याची अंमलबजावणी ठरणार 'गेम चेंजर'
राज्य शासनाकडून तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळालेली आहे. या भव्य आणि महत्त्वाकांक्षी आराखड्यांतर्गत प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांचे प्रभावी नियोजन, विविध विभागांमधील समन्वय आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान मंदिर प्रशासनासमोर आहे. तामोरे यांच्या रूपानं एका अनुभवी आणि अभ्यासू अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने, त्यांच्या या प्रशासकीय अनुभवाचा मोठा फायदा या विकासकामांना गती देण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भाविकांच्या सुविधा आणि पारदर्शकतेला प्राधान्य?
उपेंद्र तामोरे यांच्या नियुक्तीमुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्याची शक्यता आहे. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना उत्तम सोयी-सुविधा पुरवणे, मंदिर व्यवस्थापनात आधुनिकता आणणे आणि चालू असलेल्या विकासकामांना गती देणे या बाबींना नूतन प्रशासकांकडून प्राधान्य दिले जाण्याची अपेक्षा तुळजापूरकर आणि भाविकांमधून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments